प्रभाग क्र. ७ मधील नगरसेविका गायत्री पाटील यांचा उपक्रम…
अमळनेर:- जागतिक महिला दिनानिमित्त येथील प्रभाग क्रमांक ७ मध्ये खुला- भूखंड लोकार्पण सोहळा तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान अशा ५१ महिलांना सन्मानचिन्ह व भगवतद्गीतेचे पुस्तक देऊन सावित्रीच्या लेकींचा सन्मान या उपक्रमाअंतर्गत गौरव करण्यात आला. प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका गायत्री दिपक पाटील तसेच संजय गांधी निराधार समितीचे सदस्य दिपक मणिलाल पाटील यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षा जि.प. सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी प्रभागात झालेल्या विकास कामांबद्दल कौतुक केले तसेच महिलांच्या कार्याचे जेवढे कौतुक केले तेवढे कमीच आहे,आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवीत आहे. तसेच अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील,एस.एम पाटील, बन्सीलाल भागवत गुरुजी, भा.ज.पा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील,निवृत्ती बागुल तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कल्पना महंत मॅडम, डॉ.हिरा बाविस्कर,वसुंधरा लांडगे, शितल पाटील, रंजना देशमुख, प्रा.शीला पाटील, योजना पाटील, विजया गायकवाड,किरण पाटील, प्रमिला मोरे, उषा मगर यासह अनेक महिलांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रेमराज पवार यांनी केले,तर आभार निरंजन पेंढारे सर यांनी मानले. प्रभागातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.