वारंवार पाठपुरावा करून हि ग्रा. पं. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप…
अमळनेर:- तालुक्यातील पातोंडा येथे गटारीचे पाणी पुरातन घरात साचत असल्यामुळे गटार दुरुस्ती साठी निवेदन देवून ही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवासी अमोल मुसळे यांनी केला आहे.
क्रांती चौकातील त्यांचे घर हे २०० वर्षापूर्वी पुरातन वास्तू असून तिथे त्यांचा रहिवास आहे. घराच्या बाजुहून जाणाऱ्या गटारीचे बांधकाम जीर्ण झाल्यामुळे ते पाणी झिरपून तळघरात साचते. त्याठिकाणी ५-६ फूट साचलेले पाणी उपसून काढण्यासाठी दिवसातून दोन वेळा मोटर लावावी लागते. यामुळे त्यांना त्रास होत असून घरात रोगराई ने ग्रस्त होण्याचा धोका ही आहे. याप्रकरणी दोन वेळा ग्रामपंचायतीला निवेदन दिले गेले असून पदाधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी देखील केली आहे. मात्र प्रशासनाकडून या गटारीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अमोल मुसळे यांनी बिडीओ, तहसीलदार, प्रांत व जिल्हाधिकारी यांना ही निवेदन दिले असून याप्रकरणी मार्ग न निघाल्यास महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.