अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दि. 10 मार्च ते 16 मार्च 2022 पर्यंत दत्तक गाव बोरगाव ता. अमळनेर येथे, ” सात दिवसीय विशेष हिवाळी निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराचा समारोप अमळनेर तालुक्याचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून, संस्थेचे उपाध्यक्ष देविदास शामराव पाटील हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष आणि ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड चे अध्यक्ष जयवंतराव मन्साराम पाटील, संस्थेचे सचिव देविदास बारकू पाटील, संचालक चंद्रकांत रामराव शिसोदे, महारु रामदास शिसोदे, लोटन शिवदास पाटील, मनोज हिंमतराव साळुंखे, साहेबराव नारायण पाटील, सुरेश भिमराव शिंदे, युवराज काशिनाथ पाटील, डॉ. सुरेश मन्साराम पाटील, राजेंद्र फकिरा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले सर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व एन.एस.एस. गीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी शिबिरात सात दिवसांत स्वयंसेवकांनी केलेल्या विविध कामांचा आढावा सादर केला. या प्रसंगी स्वयंसेवकांनी सागर कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली “कोरोना सरे ना” हे पथनाट्य सादर केले. तसेच शिबिरात दरम्यानचे अनुभव कथन केले. तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना आवाहन केले की, समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द ठेवल्यास भारत देश नक्कीच प्रगतीपथावर पोहोचेल. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी उपयुक्त अशा टिप्स दिल्या. तर अध्यक्षीय भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष देविदास शामराव पाटील यांनी अशा शिबिरातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढून ते विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतील अशी आशा व्यक्त केली. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी शिबिरार्थी स्वयंसेवकांनी सात दिवसांत गावात केलेल्या विविध कामांचा व जनजागृती चे कौतुक केले. आणि भविष्यात ही अशाच प्रकारे कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गावातील मान्यवरांमध्ये, गावाचे उपसरपंच प्रवीण पाटील, तलाठी भावसार, महेंद्र पाटील, सुधा बापु, प्राचार्य एल. जे. चौधरी, मुख्याध्यापक सैंदाणे सर, नरेंद्र पाटील, मधू आबा, बाळासाहेब साळुंखे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी के. व्ही. पाटील अशा मान्यवरांसोबतच ग्रामपंचायत सदस्य व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक विद्यार्थीनी कु. किरण साळुंखे, कु. ज्योत्स्ना निकम व प्रा. डॉ. संजय महाजन सर यांनी तर आभार प्रदर्शन स्वयंसेवीका कु. प्राजक्ता निकम हीने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाने बहुमोल सहकार्य केले.