अमळनेर:- शहरातील पिंपळे रोड परिसरातील नवनाथ टेकडी येथील तलावात गणपती विसर्जन वेळी केलेला कचरा साफ करण्यात आला.
यावेळी राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत पिंपळे रोड परिसरातील नागरिकांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. संजय पवार, दिलीप पाटील, धनके सर, नितीन बाविस्कर, योगेश बडगुजर तसेच लहान स्वयंसेवकांचे सुद्धा सहकार्य लाभले.