
अमळनेर:- तालुक्यातील भरवस गावाजवळ वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मारवड पोलिसांनी पकडत गुन्हा दाखल केला आहे.
सपोनि जिभाऊ पाटील यांच्या आदेशानुसार पोउनि विनोद पाटील, हेकॉ सचिन निकम, शरीफ पठाण, पोकॉ उज्वल पाटील हे भरवस रस्त्यावर चोरटी वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने त्या भागात गस्त घालताना भरवसजवळील रेल्वे बोगद्याजवळ एक चोरटी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. चालकास नाव विचारले असता त्याने स्वतःचे नाव अनिल भील (रा. वारगाव ता. शिंदखेडा) व ट्रॅक्टर मालकाचे नाव प्रफुल्ल हिरालाल पाटील (रा. बेटावद ता. शिंदखेडा) असल्याचे सांगितले. मारवड पोलिसांनी चालकाला अटक करत वाळूसह हॉलंड कंपनीचे ट्रॅक्टर असा तीन लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.

