
अमळनेर:- येथील पटवारी कॉलनीतील रहिवासी तसेच किसान महाविद्यालय,पारोळा येथे कार्यरत असलेले प्रा. चंद्रकांत मुरलीधर नेतकर यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नव नियुक्त कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांच्या हस्ते पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ.नेतकर यांनी भूगोल विषयांअंतर्गत अ स्टडी ऑफ रिजनल डिस्परिटीज इन सोसिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन जलगॉन डिस्ट्रिक ऑफ महाराष्ट्र या विषयावर संशोधन केले आहे. त्यांना प्रोफेसर डॉ.ललित प्रताप संदानशिव (भूगोल विभाग प्रमुख) दादासाहेब रावल महाविद्यालय, दोंडाईचा यांनी मार्गदर्शन केले तर पारोळा येथील किसान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील यांनी सह मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली. पारोळा येथील किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तसेच जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी परिवहन मंत्री डॉ. सतीश भास्करराव पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या संशोधन कार्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.




