जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जाहीर केल्या सूचना…
अमळनेर :- जळगाव जिल्ह्यात २९ ते ३१ मार्च दरम्यान जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असून जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी २७ मार्च रोजी दिलेल्या हवामानविषयक पूर्व सूचना नुसार जळगाव जिल्ह्यात दि. २९ ते ३१ मार्च या कालावधीत तापमानात वाढ होणार असून या तीन दिवसात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने नागरिकांसाठी सूचना जाहीर केल्या आहेत.