तलाठ्यांच्या पथकाने केली कारवाई…
अमळनेर:- तालुक्यातील रणाईचे येथे तलाठ्यांच्या पथकाने कारवाई करत गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले आहे.
रणाईचे येथे अवैध गौण खनिज वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने तलाठी यांच्या पथकाने एक ट्रॅक्टर मुद्देमालासह पकडले. सदरचे ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या पथकात अमळनेर तलाठी जी आर महाजन, निम येथील तलाठी जे ए जोगी, सारबेटे येथील तलाठी आशिष पारधे, बाम्हणे येथील तलाठी सचिन बामनाथ, सावखेडा येथील तलाठी सतिष शिंदे, रणाईचे येथील तलाठी संदिप शिंदे, नंदगाव येथील तलाठी प्रकाश महाजन यांचा समावेश होता.