अमळनेर:- तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसीत रात्री एका तरुणाचा मृतदेह आढळला असून खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तुषार चिंधु चौधरी (रा प्रताप मिल कंपाऊंड मूळ रा मारवड) हा ५ रोजी रात्री बाहेर गेलेला होता. तो रात्री उशिरापर्यंत परत आला नव्हता. सकाळी मंगरूळ येथील एमआयडीसी मध्ये तो मयत अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर मार लागलेला दिसून आला. आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या.
पोलीस पाटील भागवत पाटील यांनी पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक बागुल, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास प्रक्रियेला पोलिसांनी गती दिली आहे.