अमळनेर:- शहरातील साने गुरुजी विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ आंबेडकरांचे कार्याविषयी माहिती देणारे मनोगते व्यक्त केली तर मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी डॉ आंबेडकर आणि संविधान यांच्या विषयी माहिती दिली.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी बालसभा आयोजित केली,बालसभेचे अध्यक्षस्थानी इयत्ता सहावीचा विद्यार्थी सिद्धेश ज्ञानेश्वर पाटील होता, तर च्या संपूर्ण बालसभा विद्यार्थ्यांनी चालवली, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अक्षरा बाविस्कर, लावण्या पाटील,नैतिक पाटील,गार्गी बोरसे, भार्गव पाटील यासह इतर विद्यार्थ्यांनी विचार मांडले, मुख्याध्यापक संजीव पाटील,अध्यक्ष सिद्धेश पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सूत्रसंचालन श्रेया भावसार हिने केले तर आभार हिरकणी पाटील हिने मानले बालसभा यशस्वी करण्यासाठी सहावी क व ड च्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली यावेळी महेंद्र रामोशे, सूर्यकांत पाटील आदी शिक्षक उपस्थित होते