आशिर्वादचे ६ व सहकारचे २ संचालक विजयी…
अमळनेर:- गेल्या अनेक दिवसापासून रेंगाळत असलेल्या व तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी काल पार पडून निकाल घोषित करण्यात आला. या सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.
सुरुवातीला झालेल्या अध्यक्षपदाच्या मतमोजणीत जितेंद्र झाबक यांनी, उपाध्यक्ष पदी माधुरी पाटील व जितेंद्र देशमुख तसेच विश्वस्त पदी वसुंधरा लांडगे यांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर संचालक पदासाठी मतमोजणी सुरू झाली. यात आशीर्वाद पॅनल च्या उमेदवारांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. यात आशीर्वादचे प्रदीप अग्रवाल (२२८२ मते), हरि भिका वाणी (२०४० मते), डॉ. संदेश गुजराथी (२००८ मते), निरज अग्रवाल (१८४२ मते) डॉ. अनिल शिंदे (१८२४ मते) योगेश मुंदडा (१७७२ मते) हे सहा व सहकार पॅनल चे कल्याण पाटील (१८६४ मते) विनोद पाटील (१८५१ मते) हे दोन उमेदवार संचालक पदी विजयी झाले आहेत. पराभूत उमेदवारात जितेंद्र जैन (१७६३ मते) डॉ. बी. एस.पाटील (१६९६ मते) भरत कोठारी (१५९९मते) प्रभाकर कोठावदे (१५९० मते) प्रवीण जैन (१५६७ मते) हेमंत पवार(१३१० मते) प्रसाद शर्मा (११७१ मते) गुलाब पाटील (११५६ मते) कमल कोचर (७६१ मते) यांचा समावेश आहे.