अमळनेर:- येथील द्रौ.रा. कन्या शाळेतील शिक्षक तथा खान्देश शिक्षण मंडळातील कायम शिक्षक संघाचे चिटणीस उमाकांत अशोकराव हिरे यांची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हा संघटक म्हणून जिल्हाध्यक्ष गोविंदा ठाकरे पाटील यांनी नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल हिरे यांचे शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.