
दर्शनासाठी पहाटेपासून लागल्या रांगा
अमळनेर :- श्री राम नवमी निमित्त येथील मारवड रस्त्यावरील श्री राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली असून पहाटेपासून दर्शनासाठी मंदिरात रांगा लागल्या होत्या.यानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई व फुलांनी मंदिराची सजावट करण्यात आली होती.

5 एप्रिल रोजी दुपारी चार वाजेपासून मंदिर परिसरात जळगाव प्रस्तुत ओमकार संगीत साधना कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्याचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला.तर 6 एप्रिल रोजी सकाळी 9:15 वाजता श्री राम जन्मोत्सव कथा श्रध्येय राजीव कृष्णाजी झा महाराज यांच्या अमृतवाणीतुन संपन्न झाला. तर दुपारी 12 वाजता श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी 4:15 वाजता भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाला.काही भाविकांच्या माध्यमातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद व थंड पेयाचे वाटप करण्यात आले.श्रीमंत प्रताप शेठजी यांचे पणतू चि. मिलिंद महेश अग्रवाल,मयंक महेश अग्रवाल,व अग्रवाल परिवारातील सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.तसेच निस्वार्थ सेवेकरी जितेंद्र चौधरी,पुजारी सारंग कुलकर्णी,मंदिराचे कर्मचारी महेंद्र परदेशी, गणेश चौधरी,आशिष चौधरी,सत्यवान महाजन आदींनी सहकार्य केले.तर सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र चौधरी यांनी भाविकांसाठी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले होते.




