अमळनेर:- तालुक्यातील मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या शहापूर येथे हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत् संक्रमण पडताळणी करण्यात आली.
राष्ट्रीय किटकजन्य रोग निंयत्रण कार्यक्रमांर्तगत सह संचालक आरोग्य सेवा, पुणे यांच्या परीपत्रकानुसार “हत्तीरोग दुरीकरण मोहिम 2027” अंतर्गत मार्गदर्शक सुचनानुसार सर्वेक्षण करिता प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड अतंर्गत उपकेंद्र शहापूर गावाची निवड करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तुषार देशमुख, यांच्या आदेशान्वये तालुका आरोग्य आधिकारी डॉ. गिरीष गोसावी, वैदयकीय अधिकारी डॉ. साहील चौधरी, डॉ. विदया देवरे, तालुका पर्यवेक्षक प्रशांत फुगे, किशोर माळी यांच्या मार्गदर्शनाने दि. १६ व १७ रोजी रात्री १० ते १२ वाजेच्या दरम्यान गावात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस यांच्या आरोग्य पथकाव्दारे रात्र रक्त नमुना संकलन पडताळणी करण्यात आली. गावातील १३० घरातून १५० व्यक्तींचे रात्र रक्त नमुने घेण्यात आले व प्रयोगशाळेत तपासणी केली असता एकही नमुना दूषित आला नाही. १७ रोजी १०७ घरांमध्ये १५० व्यक्तीचे रात्र रक्तनमुने घेण्यात आले व तेही प्रयोग शाळेत तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत. तीन पथकांनी रात्री दहा वाजेपासून ते बारा वाजेपर्यत रात्र रक्त नमुणे संकलन करण्यात केले.यावेळी साहेबराव घोडसे, डि.जी. पाटील, किरण चौधरी, डि.पी पाटील, योगेश कापडणे, सेविका कल्पना बडगुजर, आशा संगीता पाटील ,अंगणवाडी सेविका सुनिता पाटील मदतनीस मनिषा पाटील ह्यांनी घरोघरी जाऊन भेट देऊन किटक जन्य आजार व इतर आजारांबाबत जनजागृती केली. या मोहिमेला गावातील सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, आदींसह ग्रामस्थांनी सहकार्य केले.