गावठी दारु विक्रेत्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील झाडी येथे गावठी दारूची भट्टीवर मारवड पोलिसांनी छापा टाकून उध्वस्त केली आहे. याप्रकरणी विक्रेत्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपोनि जयेश खलाने यांना माहिती मिळाली की, झाडी येथे सुरेखा शिवदास भील ही महिला गावठी दारू विक्री करीत आहे. त्यानुसार पो.हे. कॉ. सुनील अगोने, पो.ना. सचिन निकम, होमगार्ड संभाजी पाटील हे झाडी येथे गेले असता एक महिला कॅन घेवून बसलेली दिसल्याने तिच्यावर छापा टाकला असता पोलिसाची चाहूल लागल्याने सदर महिला साहित्य टाकून पळून गेली. त्याठिकाणी कॅन, १० लिटर गावठी दारू, १०० लिटर कच्चे रसायन असा ७९०० रुपये किमतीचा माल मिळून आला. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. सदर महिलेविरुद्ध मु.प्रो.ॲक्ट ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.