अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील ६२ वर्षीय वृद्धाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना दि. ११ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
मांडळ येथील बन्सीलाल रतन कोळी हे तामसवाडी शिवारात शेतात पिकाची पाहणी करून दुपारी ३ वाजता घरी आले. त्यांना अचानक चक्कर येवू लागल्याने गावातील दवाखान्यात नेले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात घेवून गेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या मुलाच्या खबरीवरुन मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.




