
नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा, मुख्याधिकारी नेरकर यांना दिले निवेदन…
अमळनेर:- शहरातील इस्लाम पुरा भागात रस्त्याचे काम करताना पाण्याची पाइपलाइन फुटल्याने त्या भागातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे, पाइपलाइन दुरुस्ती करण्याबाबत नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
शहरातील इस्लामपुरा भागात १३ तारखेपासून पाण्याची पाइपलाइन फुटली आहे. त्यामुळे ह्या भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असून लहान मुलांसह नागरिक वारंवार आजारी पडत आहेत. सदर दुरुस्तीबाबत नगरपरिषद व ठेकेदार एकमेकांकडे बोट दाखवत असून यात नागरिकांचा बळी जात आहे. त्यामुळे तात्काळ ही दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी अस्लम काझी, शकील खाटीक, इकबाल ड्रायव्हर, छोटू मिस्तरी, सादिक शेख, हारून मलिक, आदी उपस्थित होते
शिवाजी नगर पैलाड येथेही नगरपरिषदेच्या पाण्याच्या पाईप लाईनचा व्हॉल गेल्या अनेक दिवसांपासून लिक झाला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे, तसेच या गळतीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

