
तरुणांना करण्यात आले ओळखपत्र व साहित्याचे वाटप…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावात गावाच्या सुरक्षेसाठी ग्राम सुरक्षा रक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे.

काल दिनांक १२ एप्रिल रोजी मारवड पोलीस ठाण्याच्या आवारात या ग्राम सुरक्षा दलातील तरुणांना ओळख पत्र, शिट्टी, व लाठीचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्राम सुरक्षा रक्षक तरुणांसह या गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. एपीआय जयेश खलाने यांनी या तरुण व मान्यवरांना विविध सूचना दिल्या. तसेच यावेळी गावातील तरुण, ग्रामस्थ, व पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.




