
परिसरातील नागरिकांची पैश्याची व वेळेची होणार बचत…
अमळनेर :- बाजार समितीचा पेट्रोल पंप हा उत्पन्नाचेच साधन नव्हे तर परिसरातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेली सुविधा आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे इंधनासाठी बचत, आर्थिक व वेळेची बचत होणार आहे. मी प्रशासक मंडळाचे कौतुक करतो. काम करणाऱ्यावरच टीका होते. टीका करणार्यांना घाबरू नका असे प्रतिपादन आमदार अनिल पाटील यांनी पातोंडा उपबाजार आवारातील पेट्रोल पंपाच्या उदघाटन प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार साहेबराव पाटील होते.
अमळनेर ते चोपडा दरम्यान मध्ये कुठेच पंप नसल्याने शेती साठी लागणारे इंधन आणायला देखील शेतकऱ्यांना वेळ वाया घालवून लांब जाऊन इंधन खर्च करायला लागत होते. यासाठी बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील व प्रशासक मंडळाने पातोंडा उपबाजारात पेट्रोल पंप उभारला त्यातून उत्पन्न ही वाढणार आहे. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी, काम करण्याची संधी प्रत्येकाला मिळते मात्र कामाची तत्परता आणि जनतेबद्दल आस्था असली की लोकोपयोगी कामे होऊन संस्थेचाही विकास होतो असे सांगून प्रशासक मंडळाचे कौतुक केले. मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी अवघ्या आठ ते दहा महिन्यात प्रशासक मंडळाने केलेल्या महत्वाच्या व शेतकरी हिताच्या कामांचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील ,इंडियन ऑइल चे अश्विन यादव ,माजी संचालक धनगर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे , राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन पाटील, अश्विन यादव, मिलिंद कुडे , सरपंच भरत बिरारी, जीन मालक केदार पवार, विका सोसायटी चेअरमन सुनील पवार, संदीप पवार, प्रशासक प्रा सुरेश पाटील , एल. टी. पाटील, संभाजी पाटील, बी. के. सुर्यवंशी, भाईदास अहिरे , जितेंद्र राजपूत हजर होते.
यावेळी खान्देश शिक्षण मंडळात निवडून आलेले चेअरमन हरी वाणी, व्हॉ चेअरमन योगेश मुंदडा, डॉ अनिल शिंदे, नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल , विनोद पाटील ,डॉ संदेश गुजराथी उपाध्यक्ष माधुरी पाटील , जितेंद्र देशमुख ,विश्वस्त वसुंधरा लांडगे, अडत असोसिएशनचे नूतन पदाधिकारी हर्ष बोथरा, ऋषभ पारख, योगेश वाणी, हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष रमेश धनगर, सचिव डॉ उन्मेष राठोड, सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास नगरसेवक श्याम पाटील, विवेक पाटील, अनिल शिसोदे, जयवंत पाटील, रवी पाटील, मुख्तार खाटीक, शिवाजी पाटील, महेंद्र पाटील, भागवत पाटील, रिटा बाविस्कर, कविता पवार, योजना पाटील, मंदाकिनी भामरे हजर होते. सूत्रसंचालन संजय पाटील व आभार बी के सुर्यवंशी यांनी मानले.







