१३ मोटारसायकली व इतर तिघांना ही घेतले ताब्यात…
अमळनेर:- चोरीच्या मोटरसायकल विक्रीच्या उद्देशाने फिरणाऱ्या एकास ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून १३ मोटारसायकली व इतर तीन साथीदारांना अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस स्टेशन हद्दीत वाढत्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना निर्बंध बसावा व जास्तीजास्त गुन्हे उघडकीस यावेत याकरीता वरिष्ठांनी यांनी स्वतंत्र पथक नेमण्याबाबत आदेश दिले होते. पो.नि. जयपाल हिरे यांनी पोलीस ठाण्यात पोना मिलींद भामरे, पोना सूर्यकांत साळुंखे, पोना सिध्दांत शिसोदे, पोकॉ गणेश पाटील, पोकॉ निलेश मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी नेमले होते. पो.नि. जयपाल हिरे यांना माहिती मिळाली की एक इसम हा अमळनेर शहरात चोरीची मोटर सायकल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहे. पथकाने सदर इसमास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांने त्याचे नाव दिपक सुपडु बैसाणे रा. ताडेपुरा, अमळनेर याच्या ताब्यात एक विना नंबरची दुचाकी मिळुन आली. त्यांनतर आरोपी नामे दिपक यांस विश्वासात घेवुन अधिक विचारपुस करता त्यांने त्याचा साथीदार नामे गोकुळ गणेश भिल रा. जिराळी ता. पारोळा यांच्या मदतीने मोटर सायकल चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यांनतर वरील पथकाने आरोपी नामे गोकुळ गणेश भिल रा . जिराळी ता. पारोळा यांस देखील अत्यंत शिताफिने त्याचे गांवातुन ताब्यात घेतले. त्यांनी ०५ मोटर सायकल काढुन दिली असुन वरील दोघांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी दशरथ भिका कोळी रा. जैतपीर ता. अमळनेर यांचे मार्फत ०४ मोटर सायकल व गोपाळ संभाजी वानखेडे रा. मंगरुळ ता. अमळनेर यांचे मार्फत ०३ मोटर सायकल सामान्य लोकांना नंतर कागदपत्र देतो असे सांगुन विक्री केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आत्ता पावेतो चोरीच्या १३ मोटर सायकल हस्तगत करून गुन्ह्यांत चोरी करणारे दोन व चोरीच्या मोटर सायकल विक्री करणारे दोन अशा चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अमळनेर पोलिसांचे आवाहन….
कमी किमतीत विना कागदपत्र कोणीही मोटर सायकल विक्री करीत असल्यास नागरीकांनी ती घेवु नये तसेच विना कागदपत्राच्या मोटर सायकल कोणाकडे असल्यास पुढील कायदेशिर कार्यवाही टाळण्यासाठी पोलीस स्टेशनला स्वताहुन जमा कराव्यात अन्यथा विना कागदपत्र म्हणजेच चोरीच्या मोटर सायकल विकत घेणाऱ्यास ही आरोपी केले जाईल असे अमळनेर पोलीस स्टेशन कडुन सांगण्यात आले आहे.