
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथे ७० वर्षीय वृद्ध इसमाने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ रोजी रात्री उघडकीस आली आहे.

कळमसरे येथील काशिनाथ पंढरीनाथ महाजन (वय ७०) यांनी स्वतःच्या खळ्यामध्ये लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोराने गळफास लावून घेतला. २८ रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गावकऱ्यांनी मृतदेहाला खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. संजीव महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.