अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील २१ वर्षीय तरुणी झाल्याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दि. १६ रोजी सदर २१ वर्षीय तरुणी जळगाव येथे पेपर असल्याचे सांगितल्याने तिच्या भावाने तिला अमळनेर बस स्थानकावर सोडले. त्यानंतर मी बस आल्यावर निघून जाईल असे सांगत तिने भावाला घरी पाठवले. त्यानंतर संध्याकाळ पर्यंत घरी परतली नाही व कोणत्या नातेवाईकाकडे ही गेली नाही. तिचा शोध घेतला असता तिचा तपास न लागल्याने तक्रारदार हिरामण मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारवड पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.