अमळनेर:- येथील लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित, सी.बी.एस.ई. सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूल,मंगरूळ येथे उन्हाळी शिबीर म्हणजेच समर कॅम्प उद्घाटन करण्यात आले.
ह्या शिबिराचा मुख्य हेतू म्हणजे अमळनेरच्या विद्यार्थ्यांना क्रीड़ा व इतर क्षेत्रात वाव मिळावा हा आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेरचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, माजी आमदार बी. एस. पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक तिलोतमा पाटील, प्रताप कॉलेजचे माजी प्राचार्या ज्योती राणे, संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र बोहरा, ओम शांतीचे प्रशासक विद्या दीदी, पारोळा स्कूलचे प्राचार्या शोभा सोनी व प्राचार्य मंजुळा नायर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती देवीचे पूजन करून शाळेच्या ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मशाल पेटवली. विद्यार्थी सारंग देवरे याने स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे मने जिंकली. याप्रसंगी शाळेचे नवीन भव्य बास्केट बॉल व बॅडमिंटन मैदानाचे देखील उद्घाटन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मुलांना सशक्त बनवा त्यांना ऊन, वारे पाहू द्या व ह्या शिबिराचे भरभरून फायदे मुलांना घेऊ द्या नंतर माजी आमदार बी.एस. पाटील यांनी देखील शिबिराचे आयोजनाचे कौतुक करून सांगितले की अमळनेर मध्ये प्रथमच अशी संकल्पना आली आहे त्यामुळे मुलांना याचा नक्कीच फायदा होईल, ओम शांतीचे प्रशासक विद्या दीदीने आपल्या मनोगतातून सांगितले की, शिबिरात योगासन देखील घेण्यात येणार आहे त्यामुळे मुले मानसिक सशक्त बनतील. जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांनी सांगितले की शिबिरात एरोबिक व झुंबा देखील आहे त्यामुळे शिबिराचा लाभ हा मनापासून घ्यावा व शारीरिक आणि मानसिक सशक्त व्हावे. प्राचार्या मंजुळा नायर यांनी देखील आपल्या भाषणात सांगितले की अमळनेर मध्ये प्रथमच अशी संकल्पना असल्यामुळे पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला व शेवटी प्रवेश बंद करावे लागले. शेवटी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र बोहरा यांनी सांगितले की बोहरा परिवार हे मुलांचा चांगल्या भवितव्यासाठी नेहमीच तत्पर असते व शाळा स्थापन करण्याचे मुख्य उद्देश म्हणजे तालुक्यातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शैलजीत शिंदे व मनीष पाटील यांनी केले तर आभार विद्यार्थी मनस्वी बोरसे हिने मानले व यशस्वितेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.