अमळनेर:- तालुक्यातील मंगरूळ येथे दि 16 रोजी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथे आरोग्यवर्धिनी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी एकूण 130 लोकांचे एन सी डी स्क्रीनिंग करण्यात आले. त्यातील हाय रिस्क पीटीएसला 19 रोजी होणाऱ्या कॅम्प बद्दल माहिती देऊन तेथील स्पेशालिस्ट डॉक्टरचा सल्ला घेण्याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच महिलांना दैनिक जीवनात येणाऱ्या आरोग्य समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. लहान मुलांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. उन्हाळ्यात बालकांची घ्यावी लागणारी विशेष काळजी याबाबत मातांना मार्गदर्शन करण्यात आले. उपकेंद्र अंतर्गत असणाऱ्या सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बचतगट महिला यांचे बीपी, शुगर व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. उपस्थित सर्व ग्रामस्थांना आरोग्यवर्धिनी केंद्राबद्दल, तेथील उपलब्ध सेवाबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी डॉ हेमंत कदम, श्रीमती गोपी वळवी, चंद्रशेखर पाटील व सर्व आशा सेविका उपस्थित होत्या.