
दिसून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन…
अमळनेर:- तालुक्यातील झाडी येथील ८३ वर्षीय वृद्ध हरविले असून कोणाला दिसून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
झाडी येथील रहिवासी सुकलाल काळू देवरे (मिस्तरी) हे १९ एप्रिल रोजी 9 वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे सकाळी बस स्टँडवर जावून येतो असे सांगून घराबाहेर पडले मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने त्यांचा तपास घेतला असता ते मिळून आले नाही. यानंतर सर्वत्र नातेवाईक यांच्याकडे संपर्क केला असता तेथेही ते नसल्याचे कळाल्याने मारवड पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद त्यांचा मुलगा शिवाजी देवरे यांच्या फिर्यादीवरुन करण्यात आली आहे. ते कोणाला दिसल्यास मोबाइल क्र. 9021202650 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.







