
अमळनेर:- येथील धनदाई महाविद्यालयाच्या “धनदाई” या वार्षिक नियतकालिकास कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे उत्कृष्ट मुखपृष्ठाबद्दल तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
मुखपृष्ठाची संकल्पना मांडणाऱ्या प्रज्ञानंद सावंत या बी ए तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी पाटील प्राचार्य डॉ. प्रमोद पवार नियतकालिकाचे संपादक डॉ. भगवान भालेरा, आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. लीलाधर पाटील, प्रा. प्रशांत पाटील, डॉ. शैलेश पाटील आदी उपस्थित होते. गेली दोन वर्ष करोना महामारीने जग व्यापलेले असताना अमळनेर शहरात यादरम्यान कार्य करणाऱ्या डॉक्टर, पोलीस, पत्रकार व इतर समाजसेवी संघटना यांच्या कार्याचा गौरव, तसेच कोरोनामुळे जगात झालेले बदल हे धनदाई अंकाने आपल्या मुखपृष्ठ प्रतिबिंबित केले होते. याबद्दल नुकताच विद्यापीठाने हा पुरस्कार जाहीर केला असून हा पुरस्कार महाविद्यालय व मुखपृष्ठाची संकल्पना मांडणाऱ्या विद्यार्थी यांना विभागून देण्यात येणार आहे. अमळनेर येथील एस.. के ऑफसेटचे मनीष बडगुजर यांनी मुद्रित केलेल्या या नियतकालिकेचे संपादन डॉ भगवान भालेराव यांनी केले असून संपादक मंडळात प्रा. प्रशांत पाटील, प्रा मीनाक्षी इंगोले प्रा. लीलाधर पाटील हे होते. या यशाबद्दल चेअरमन बापूसाहेब के. डी. पाटील, संचालक शैलेंद्र पाटील यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपादक मंडळ व प्रज्ञानंद सावंत यांचे अभिनंदन केले आहे.







