
अमळनेर:- तालुक्यातील प्रगणे डांगरी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकमान्य पॅनेलच्या उमेदवारांचा मोठ्या बहुमताने विजय होऊन शेतकरी पॅनलचा दारुण पराभव झाला. डांगरी, सात्री आणि कलाली या तिन्ही गावांचा या संस्थेत समावेश आहे.

४ एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकारी सुनील महाजन यांचे अध्यक्षतेखाली चेअरमन व्हॉइस चेअरमन यांची निवड होऊन चेअरमनपदी सुधाकर बाजीराव शिसोदे व व्हाईस चेअरमनपदी प्राचार्य भगवान सिताराम पाटील यांची एकमताने निवड झाली. या विजयासाठी अमळनेर शेतकरी संघाचे माजी प्रेसिडेंट माजी सरपंच अनिल शिसोदे, अमळनेर सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र शालीग्राम बोरसे, दूध संस्था चेअरमन महारु पाटील, माजी सरपंच लोटन आधार पाटील, पुंजू वंजी शिसोदे, अनंतराव हिम्मतराव शिसोदे, जयवंतराव रामराव शिसोदे, उदय अर्जुन शिसोदे, माजी सरपंच रामचंद्र आसाराम पाटील, विजय जगन्नाथ शिसोदे, माजी सरपंच दीपक साहेबराव शिसोदे, शालिक विक्रम पाटील, प्रकाश अमृत शिसोदे, दिलीप जगन्नाथ पाटील यांनी सहकार्य केले.
माजी मंत्री व आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ,बाजार समितीचे चेअरमन अशोक पाटील यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा चेअरमन नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

