
अमळनेर :- शहरातील राम नगर,भालेराव नगर तसेच आर के नगर परिसरात डासांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पालिका प्रशासनाने धुराळणी करून डासांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

शहरातील विविध भागात डासांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.काही ठिकाणी असलेल्या उघड्या गटारी, साचलेले पाण्याचे डबक्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरात धुराळणी करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

