
अमळनेर:- तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे दररोज तापमान 44° पेक्षा अधिक राहत असल्याने, उन्हाच्या झळा प्रत्येक नागरिकाला बेचैन करत आहेत. मनुष्य त्याच्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो, मात्र मुके प्राणी-पक्षांना उन्हाच्या तीव्रतेमुळे होणाऱ्या त्रासापासून वाचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.उन्हाच्या तीव्र झळीमुळे पशुपक्षांवर परिणाम जाणवत आहे. त्यासाठी येथील सामाजिक व सेवाभावी कार्य करणाऱ्या जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेलीकडून पाण्याच्या टाक्या व मातीचे भांड्यांचे वाटप करण्यात आले.

उन्हाळ्यात मुक्या जनावरांना पाण्याची सोय व्हावी यासाठी दिनांक 2 मे रोजी भटक्या प्राण्यांसाठी, मोकाट गाई आणि कुत्र्यांसाठी शहरात 11 ठिकाणी सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या व पक्ष्यांसाठी 50 मातीचे पाण्याचे भांडे ठेवण्यात आले. यावेळी ग्रुपचे अध्यक्षा सौ.दिपिका सोनवणे,उपाध्यक्ष सौ.शोभा पाटील, सचिव सौ.कल्पना पाटील,सौ. योगिता पांडे, सौ. कविता पाटील व श्रीमती भारती कोळी उपस्थित होत्या


