
अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे येथे सट्टा घेणाऱ्या इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व मारवड पोलिसांनी रंगेहाथ पकडले तसेच गावठी दारू विकणाऱ्या एकावर ही कारवाई केली आहे.

शिरसाळे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक व मारवड पोलिसांनी छापा टाकला असता नारायण पूणा कोळी (वय ७१) हा सट्टा जुगाराच्या साहित्यासह रंगेहाथ आढळून आला. त्याच्याकडून ८९० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच मारवड येथील बस स्टँड जवळील गॅरेजच्या मागे मारवड पोलिसांनी छापा टाकला असता मनोहर संभाजी पाटील (वय ४५) रा. गोवर्धन हा गावठी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.


