
अमळनेर पोलिसांनी मध्यप्रदेशातील दुर्गम भागात वेगवेगळ्या ठिकाणावरून आरोपींना केले जेरबंद…
अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील ठेकेदाराच्या भावाचा अमानुषपणे मारहाण करून खून करून पसार झालेल्या पाचही आरोपीना अमळनेर पोलिसांनी शिताफीने मध्यप्रदेशातून अटक केली आहे.

पातोंडा येथे विजेच्या तारा ओढण्यासाठी मजुरांची मध्यप्रदेशातून ने आण करणाऱ्या कैलास शामसिंग प्रजापती याला २९ रोजी मजुरांनी त्यांचे कामाचे पैसे देत नव्हता आणि दुसरे कामगार कामावर आणले म्हणून लोखंडी पाईप ,लोखंडी पहार ने हातावर ,पायांवर ,तोंडावर अमानुषपणे मारहाण केली होती. कैलास रात्रभर विका सोसायटी कार्यालयात बेशुद्ध पडून होता. सकाळी त्याला उपचारासाठी अमळनेर हुन धुळे व नंतर इंदोर ला दवाखाण्यात दाखल केले होते. मारहाण करणारे आरोपी फरार झाले होते. उपचारादरम्यान कैलास चा मृत्यू झाला होता.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवून पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , हेडकॉन्स्टेबल विजय भोई , पोलीस राहुल गोकुळ पाटील व राहुल नारायण पाटील यांना आरोपीना शोधायला पाठवले. आरोपी मध्यप्रदेशातील दुर्गम डोंगर भागात वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेले होते. पोलीस पथकाने मोबाईल सेलचे गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांचे तांत्रिक सहाय्य घेत गोपाल साहुलाल धुर्वे (वय ३५) पंकज उमरावसिंग शिलु (वय २७) सलीम निर्मलशहा धुर्वे (वय २२) रोहित बुद्धसिंग शिलु (वय १९) आणि शिवम फुलसिंग शिलु (वय १८) सर्व रा बीजाधाना पो. ईटावा ता तामिया जि छिंदवाडा मध्यप्रदेश यांना मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने सुमारे १०० ते १५० किमी परिसरातून विविध डोंगर दऱ्यातून अटक केली आहे.

