
अमळनेर : संत सेवालाल महाराज बंजारा/लबाण तांडा समृद्धी योजना अंतर्गत एक महत्त्वपूर्ण बैठक गटविकास अधिकारी एन.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अमळनेर तालुक्यातील बंजारा समाजाच्या तांड्याना स्वतंत्र तांडा वस्तीचा दर्जा जाहीर करण्यात आला. त्यांना महसूली गाव म्हणून मान्यता मिळण्यासाठी जिल्हाधिकारीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

🟩 यावेळी तालुका अशासकीय सदस्य किरण जाधव व संजय राठोड उपस्थित होते. या बैठकीत अमळनेर तालुक्यातील बंजारा समाजाच्या तांड्याना ‘स्वतंत्र तांडा वस्ती’ म्हणून घोषित करण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली असली, तरी आजपर्यंत बंजारा समाजाच्या वस्त्यांना तांडा म्हणून अधिकृत मान्यता मिळालेली नव्हती. त्यामुळे आजचा निर्णय हा बंजारा समाजासाठी एक सुवर्ण क्षण ठरला आहे.
🟨 या तांड्यांना स्वतंत्र महसूल दर्जा (Revenue Status) मिळण्यासाठी जिल्हाधिकारीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. असे बैठकीत जाहीर करण्यात आले.
🟥 यावेळी गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी समाजाच्या विकासासाठी सुरू असलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला. या बैठकीस रामेश्वर खुर्द तांडा येथील सरपंच गजेंद्र जाधव सुद्धा उपस्थित होते.
🟫 तालुक्यात नऊ बंजारा तांडा होते त्यात रणाईचे तांडा ला स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा आहे. ८ तांडा वस्तीना स्वतंत्र महसूली गाव म्हणून दर्जा मिळेल जर ती वस्ती ७०० लोकसंख्यापर्यंत पोहचली तर स्वतंत्र ग्रामपंचायत होऊ शकते- एन आर पाटील ,गटविकास अधिकारी अमळनेर
हा निर्णय अमळनेर तालुक्यातील बंजारा समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी एक मजबूत पाऊल ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




