
अमळनेर : तालुक्यातील पळासदळे शिवारातून १ लाख ६० हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर शेतातून चोरून नेल्याची घटना १२ जून रोजी रात्री घडली.

गुलाबराव अभिमन पाटील वय ६० रा ढेकू रोड यांचे पळासदळे शिवारात गट नम्बर १२/४/१ मधील शेतात त्यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच- १९ ,इ ए- ७५९२ हे शेतात बांधलेल्या घरासमोर लावले होते. १३ जून रोजी ते शेतात दिसून आले नाही. गुलाबराव पाटील यांनी शोध घेतला असता त्यांना ट्रॅक्टर मिळून आले नाही म्हणून त्यांनी १९ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

