डांगरी परिसरातील शेतकऱ्यांनी दिला उपोषणाचा इशारा…
अमळनेर:- तालुक्यातील डांगरी परिसरातील शेतकऱ्याच्या शेतातील उसाच्या तोडणीसाठी साखर कारखान्याकडून विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी प्रांतांना निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, डांगरी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चोपडा सहकारी साखर कारखान्याकडे तोडणीसाठी (गाळपासाठी) नोंदणी केली होती. मात्र आजपर्यत साखर कारखान्याकडून उसाची तोडणी करण्यात आलेली नाही. ऊस जास्त काल शेतात उभा असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच पावसाळा जवळ येत असून शेत खाली न झाल्यास खरीप हंगामाचे पीक घेता येणार नाही. त्यामुळे आपल्या स्तरावरून कार्यवाही करावी अशी विनंती प्रांताधिकारी यांना केली आहे. ऊस तोडणी न झाल्यास पंचनामे करून नुकसानी भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी अनिल शिसोदे, सुरेश पाटील, लोटण पाटील, विजय शिसोदे, चंद्रकांत शिसोदे यासह शेतकरी उपस्थित होते.