
अमळनेर : तालुक्यातील झाडी येथील नंदलाल किसन पाटील वय ५२ याने स्वतःच्या शेतात निंबाच्या झाडाला ठिबक नळ्या बांधून गळफास घेतल्याची घटना १७ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
नंदलाल यांच्याकडे ४ बिघे शेती असून त्याच्यावर बँकेचे आणि सावकारी कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्याच्या पश्चात वृद्ध आई , पत्नी , मुलगा आणि विवाहित मुली असा परिवार आहे. मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी करीत आहेत.

