
36 सदस्यांसाठी 18 प्रभागाची रचना, 31 ऑगस्ट पर्यंत हरकती व सूचना मागविण्याची मुदत
अमळनेर -येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी प्रारूप प्रभाग रचना तथा भौगोलिक सीमा दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली असून अमळनेर शहरात 36 सदस्यासाठी 18 प्रभागाची रचना झाली आहे, 31 ऑगस्ट पर्यंत हरकती व सूचना मागविण्याची मुदत देण्यात आली आहे.
प्रारूप रचना पालिकेच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे.सबधितांनी हरकती व सूचना दिनांक 18 ते 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद कार्यालय यांच्याकडे सादर करावयाच्या आहेत.हरकती व सूचना दाखल केलेल्या नागरिकांना सुनावणी करता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल असे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून इच्छुक उमेदवाराना आपली प्रभाग रचना कशी असेल याबाबत उत्सुकता होती. 2017 साली झालेल्या निवडणूकित एकूण 17 प्रभाग होते,यात 34 सदस्य निवडून आले होते.यंदा एक प्रभाग म्हणजेच दोन सदस्य संख्या वाढली असून अनेकांच्या प्रभाग रचनेत देखील बदल झाला आहे.यामुळे कही खुशी कही गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.हरकतीची प्रक्रिया आटोपल्यावर सप्टेंबर महिन्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

