सागर मोरे
अमळनेर:- जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख आणि रसायनशास्त्र प्रशाळेचे संचालक असलेले प्रा. आर. एम. राठोड हे दि.31 मे रोजी सेवानिवृत्त झालेत.त्यांच्या नंतर त्या विभागातील डॉ.योगेश मोरे यांच्याकडे महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे यांनी रसायनशास्त्र विभाग प्रमुख आणि रसायन शास्त्र प्रशाळेचे संचालक पद सोपविले. डॉ.योगेश मोरे यांनी रसायनशास्त्र विषयांत विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली असून त्यांनी अनेक संशोधन पेपर,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यांनी अनेक वेळा महाविद्यालयातील केमिस्ट्री टॅलेंट सर्च परीक्षेचे समनव्ययक पदी सुद्धा कार्य केले आहे. त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी महाविद्यालय प्रशासन आणि सहकारी प्राध्यापक मंडळींनी विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे.