
राज्यातील अल्पसंख्याक नेत्यांचे अमळनेरातील मुस्लिम समाज बांधवाना आवाहन
अमळनेर:-येथील मुस्लिम समाज बांधवांनी आतापर्यंत अनेक नेते व राजकीय पक्षांना अजमावले मात्र हाती काही लागलेच नाही,त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विकासाचे मोठे व्हिजन असलेले आमदार अनिल पाटील यांना अजमावून पाहावे व त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्यातील अल्पसंख्याक नेत्यांनी अमळनेर येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले होते. हा मेळावा माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.तर राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या नेत्या आ.सना मलिक,माजी आ.जिशान बाबा सिद्दीकी,अल्पसंख्याक समाजाचे युवा नेतृत्व नजीब मुल्ला व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड नाझेर काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार,माजी नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील व इतर नेतेमंडळी उपस्थित होती.मेळाव्यास शहर तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
यावेळी जिशान सिद्दीकी बोलताना म्हणाले की राज्यात एकही असा नेता असा नाही जो अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी ठाम उभा राहील.यात फक्त अजितदादा पवार अपवाद आहेत,अल्पसंख्याक समाजावर कुठेही अन्याय होईल तेव्हा ते पाठिशीच उभे दिसतील.येणाऱ्या काळात येथे पालिका निवडणूक आहे,आतापर्यंत अनेक नेते व पार्टीला आजमावले,आता राष्ट्रवादी व अनिल दादा पाटील यांना अजमावून पहा असे आवाहन त्यांनी केले.
सर्व जाती धर्माच्या लोकांना मोत्यांच्या माळेप्रमाणे जोडणार
आमदार अनिल पाटील बोलताना म्हणाले की अमळनेर आमचं छोट शहर आहे,येथील प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती मोत्या सारखा होता,आमची मोत्याची माळ चमकतही होती,मात्र कुणीतरी आल आणि आमच्या मोत्याच्या माळेला नजर लागली,तीच मोत्यांची माळ मी सर्वाना एकत्र आणून पुन्हा जोडणार आहे.आमदार म्हणून या तालुक्यात अल्पसंख्याक निधी मी मोठया प्रमाणात आणला,साहेबराव दादांनीही खूप विकास केला,मात्र ज्याच्या मागे तुम्ही उभे राहिलात त्याने तुम्हाला 14 वर्षात काय दिल हा प्रश्न स्वतःला विचारा,आणि मागचे विसरून एकत्र या एकाही व्यक्तीला मी अंतर देणार नाही,कोणत्याही जाती धर्माला मदतीसाठी तत्पर राहील,फक्त एकजूट ठेवा असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सना मलिक यांनी कठीण काळात अजित दादा यानी आमच्या कुटुंबाला हिंमत दिली, जिशान सिद्दीकी यांनाही ते हिम्मत देत असतात,विविध योजना आणून अल्पसंख्याक समाजाचे अनेक प्रश्न अजित दादा पवार यांचेकडून सोडविले जात आहे.अजित दादा बोलणारे नाही तर करणारे नेते आहेत.त्याचप्रमाणे अनिलदादा देखील क्रियाशील नेतृत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष नाजेब मुल्ला म्हणालेत की अमळनेर येथे संत सखाराम महाराज यांच्या रथास पहिली मोगरी लावण्याचा मान मुस्लिम समाजाला आहे,अश्या भूमीत इस्लाम धोक्यात येऊच शकत नाही,तुम्ही सर्वाना अजमावले आता अजित दादांना व अनिल दादांना अजमवावे,या सरकार मध्ये अल्पसंख्याक निधी नियमित प्राप्त झाला आहे.लाडकी बहीण सुरू करणारे अजित दादा आमच्या बहिणींचे हम दर्द आहे.फक्त थोड प्रतीक्षा करा अनिल दादा मंत्री होणारच आहेत.येणाऱ्या दिवसात आपल्या कॉमचे भले करण्यासाठी अनिल दादाना साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.यावेळी युवा नेते आरिफ भाया व नावेद शेख यांनीही मनोगत व्यक्त करून मुस्लिम समाजाला आमदार अनिल पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.यावेळी अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सूत्रसंचालन इम्रान खाटीक यांनी केले.मेळाव्यास असंख्य माजी नगरसेवक व शहर आणि ग्रामीण पदाधिकारी उपस्थित होते.
मेळावा यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष अलीम मुजावर व शहराध्यक्ष कलीमोद्दीन शेख यांनी परिश्रम घेतले.




