
वॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, तरुण वर्ग, व मित्र परिवाराची मिळतेय खंबीर साथ…
अमळनेर : नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ मध्ये उच्चशिक्षित व तरुण नेतृत्व म्हणून इंजिनिअर भाग्यश्री जैन–पाटील यांना नागरिकांची पसंती मिळत असून नागरिकांशी थेट संवाद साधत, प्रभागातील विकासकामांची दृष्टी आणि नियोजन स्पष्टपणे मांडत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शैक्षणिक पात्रतेबरोबरच सामाजिक भान आणि विकासदृष्टीचा समन्वय असणाऱ्या भाग्यश्री जैन–पाटील यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, तसेच महिलांच्या सक्षमीकरण आणि युवकांच्या सहभागातून सर्वांगीण विकासाची दिशा आखली आहे.
सामाजिक कार्यकर्ते पती भावेश जैन यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. इंजि. भाग्यश्री जैन–पाटील यांना प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिक, महिला व युवकवर्गाचा मोठा प्रतिसाद लाभत असून युवा नेतृत्वास यंदा संधी द्यावी, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.




