महिला व अपंग मुलाला मारहाण केल्याची पोलीसात फिर्याद…
अमळनेर:- तालुक्यातील तांदळी येथे शेतात बैलगाडी का सोडली या कारणावरून वाद होवून महिलेने तिला व तिच्या अपंग मुलाला मारहाण झाल्याची तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तांदळी येथे राहणाऱ्या ज्योती प्रभू परदेशी यांचा मोठा मुलगा प्रज्योत परदेशी हा अपंग असून त्याच्यासोबत त्या दिनांक १५ रोजी जुपने घेतलेल्या शेतात गेल्या होत्या. त्यावेळी बाजूचे शेतकरी राजेंद्र बालचांद परदेशी यांनी फिर्यादीच्या शेतात बैलगाडी सोडली. प्रज्योत याने बैलगाडी आमच्या शेतात का सोडली अशी विचारणा केली असता त्यांनी मी बैलगाडी इथेच सोडणार असे उत्तर दिल्याने प्रज्योत हा स्वतः बैलगाडी बाजूला करू लागला असता राजेन्द्र परदेशी यांनी त्याला चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांचा मुलगा भूषण राजेंद्र परदेशी देखील शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी महिला आपल्या मुलाला वाचविण्यासाठी मध्ये आली असता तिला ही मारहाण करीत अश्लील शिवीगाळ करत दोघांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. त्यावरून मारवड पोलीसात दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो ना सचिन निकम करीत आहेत.