
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. 21 जून “आंतरराष्ट्रीय योग दिन ” साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयात योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले सर होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. देवदत्त पाटील यांनी योगाचे महत्त्व विषद केले. यावेळी महाविद्यालयातील माजी रासेयो कार्यक्रम अधिकारी व संरक्षणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जितेंद्र माळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवर व रासेयो स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनींकडून योगासने व प्राणायाम यांचा सराव करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. डॉ. माधव वाघमारे, प्रा. डॉ. सतिश पारधी, प्रा. किशोर पाटील हे होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाने बहुमोल सहकार्य केले.







