अमळनेर:- येथील एका वेब न्यूज चॅनलच्या संपादकाला विरोधात बातमी लावल्याचा राग धरून नगरसेवकाने धमकी दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.
येथील दिव्य लोकतंत्र या वेब न्यूजचे संपादक समाधान मैराळे यांनी नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्डातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मालिका सुरू केल्याने शहरातील साने नगर परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार वार्डातील मंदिरासह अनेक विकासाची कामे पूर्ण न केल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न बातमीच्या माध्यमातून उपस्थित केल्याने त्या परिसरातील नगरसेवक संतोष पाटील उर्फ भुऱ्या आप्पा यांनी मैराळे यांना भ्रमणध्वनी द्वारे बातमी लावल्याचा राग आल्याने जीवे मारण्याची धमकी सह खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याने त्या विरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात भादवी ५०७ नुसार एनसी दाखल करण्यात आली आहे.
जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणे, संविधान विरोधी कृत्य करनाऱ्या विरोधात आवाज उठविणे, नागरिकांच्या समस्यांना प्रशासना पर्यंत माध्यमातून पोहचविणे आदी आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचे काम पत्रकार करीत असतात.समाजमनाचा आरसा म्हणून प्रसार माध्यमाची प्रतिमा असल्याने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टीनां प्रकाशित करून कायद्याने प्रतिबंध होण्यासाठी जनमत तयार करणे, हे प्रसार माध्यमाचे कर्तव्य असल्याने, तो पत्रकार ते करीत असतांना त्याला धमकी देने, त्याच्या वर हल्ला करने तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविणे, अश्या गोष्टी सर्रासपणे सुरू आहे. याला पायबंद घालण्यासाठी प्रशासनानाने कडक पावले उचलली पाहिजे, अशी चर्चा सुज्ञ करतांना दिसतात.