
योगेश मुंदडे प्रेसिडेंटपदी, तर सेक्रेटरीपदी महावीर पहाडे होणार विराजमान…
अमळनेर :- येथील लायन्स क्लबचा पदग्रहण समारंभ रविवार , दिनांक २६ जून रोजी हॉटेल मिड टाऊन ( तंबोली टॉकीज ) येथे सायंकाळी साडे सहा वाजता होणार आहे. उपप्रांतपाल एमजेएफ गिरीश सिसोदिया इन्स्टोलेशन ऑफिसर आहेत. रिजन चेअरमन जयेश ललवाणी व सुभाष तळेकर प्रमुख पाहुणे आहेत. नूतन कार्यकारिणीत खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक योगेश मुंदडे प्रेसिडेंट, माजी नगरसेवक महावीर पहाडे सेक्रेटरी तर अनिल रायसोनी ट्रेझरर पदाचा पदभार स्वीकारतील. तसेच लिओ क्लबच्या नूतन अध्यक्षपदाचा पदभार हरिओम अग्रवाल स्वीकारतील.







