पोलिसांच्या हातावर तुरी देवून झाला होता पसार…
अमळनेर:- येथील सराईत गुन्हेगार राजेश एकनाथ निकुभ उर्फ दादू धोबी यास पोलीस मुख्यालयातील पोलीस अंमलदार यांनी दि. २४ रोजी न्यायालयात तारखेवर आणल्यानंतर जळगाव येथे परत घेवून जात असताना आरोपी याने बस स्थानक अमळनेर येथून दुपारी ०४.३० वाजेचे सुमारास पोलिसांच्या हाताला झटका मारून पळ काढला होता. त्याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला भादवि कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर आरोपीचा शोध घेणेसाठी पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली एएसआय बापू साळुंखे, हेकॉ सुनील हटकर, पोना दिपक माळी, पोना रवींद्र पाटील, पोना निलेश मोरे, पोना गणेश पाटील, चालक पोना सुनील पाटील यांचे पथक नेमण्यात आले होते. त्यांनी आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी फागणे धुळे याठिकाणी असुन पुढे सुरतला पळून जात आहे, अशी माहीती त्याचा साथीदार व सराईत गुन्हेगार तुषार प्रदीप कदम रा नवल नगर याला ताब्यात घेवून मिळवली व नंतर तालुका पो स्टे धुळे याची मदत घेऊन सराईत गुन्हेगार राजेश उर्फ दादू एकनाथ निकुंभ यास बाळापूर गावाजवळून शिताफीने पकडून अमळनेर पोलीस स्टेशनला आणले. फरार सराईत आरोपीस पोलिसांनी २४ तासात जेरबंद केल्याने अमळनेर पोलिसांचे कौतुक होत आहे.