दोघांना रंगेहाथ पकडत भट्टी व कच्चे रसायन केले नष्ट…
अमळनेर:- तालुक्यातील बाम्हणे येथे दोन गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर मारवड पोलिसांनी छापा टाकून रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपोनि जयेश खलाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार पो.हे. कॉ. भरत इशी, हे.कॉ. फिरोज बागवान, पो.ना. सुनील तेली, पो. कॉ. तुषार वाघ, यांच्यासह पो.हे. कॉ. संदिप पाटील, पो.ना. प्रवीण मंडोळे (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या पथकाने संयुक्तरित्या बाम्हणे येथे भेट दिली असता सुरेश रोहिदास भील हा घराच्या गावठी दारूचा कॅन विक्रीच्या हेतूने घेवून बसलेला दिसल्याने पोलिसांनी छापा टाकला असता त्याठिकाणी १२०० रुपये किमतीची गावठी दारू व १३४०० किमतीचे ६७० लिटर कच्चे रसायन असा १४,६०० रू. किमतीचा मुद्देमाल आढळून आला. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला.
तसेच बाम्हणे गावात राधेश्याम राजाराम भील हा गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने तिथे पथकाने छापा टाकला असता राधेश्याम भील हा १२०० रू. किमतीची दारू व ५४०० रू. किमतीचे कच्चे रसायनासह आढळून आला. नमुने घेवून उर्वरित मालाचा जागीच नाश करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध मु.प्रो. ॲक्ट ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.