
निम येथे घडली घटना, पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील निम येथील ६२ वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर फांदी पडून मुका मार लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल २ जुलै रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निम येथील रतीलाल नागो कोळी हे आपल्या पत्नीसह शेतात निंदनी करण्यासाठी गेले होते. झाडाखाली पाणी पिण्यासाठी गेले असता हवेने झाडाची फांदी त्यांच्या अंगावर पडली व छातीस मुका मार लागल्याने ते लागलीच बेशुद्ध झाले. त्यांना खाजगी वाहनाने घेवून जात अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मुलाच्या फिर्यादीवरुन मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







