
पत्नीने केली मारवड पोलीसात बेपत्ता झाल्याची तक्रार…
अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथील २३ वर्षीय तरुण संतापाच्या भरात घरातून निघून गेला असून दुसऱ्या दिवशी देखील तो न परतल्याने त्याच्या पत्नीने हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खुशाल राजेंद्र पारधी हा तीन चार दिवसापासून कामाला जात नसल्याने पत्नी अश्विनी ही बोलली असता वाद झाल्याने दि. २ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता बाहेर पडला. त्यास फोन केला असता मी घरी येणार नाही असे सांगून त्याने फोन बंद केला. व आजुबाजुला तपास केला असता कोठेही आढळून न आल्याने अश्विनी खुशाल पारधी यांच्या फिर्यादीवरून हरविल्याची तक्रार मारवड पोलीसात दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.




