अमळनेर:- अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीत ध्येयवेड्या विद्यार्थ्याने यशस्वीपणे परिस्थितीवर मात करीत जिद्दीने मुंबईच्या केईएम रुग्णालयात प्रवेश घेतला. डॉ चेतन सनेर या तरुणाने एम डी जनरल ही पदवी संपादन केली. कोरोनाच्या परिस्थितीत देखील त्याने कौशल्याने मात करत केईएम हॉस्पिटलमध्ये 48 तास प्रशिक्षण घेतले. त्यातच एम डी झाला आता पुन्हा डी एम ही पदवी गाठण्याचे त्याचे ध्येय आहे.
मूळचे हातेड येथील रहिवासी नितीन सनेर हे सध्या मारवड येथील माध्यमिक शिक्षण संस्थेत नोकरीला असून त्यांचा चेतन हा चिरंजीव आहे. त्याचा कृषी नगर मधील निवासस्थानी भेट देऊन त्याच्या यशस्वी वाटचालीबाबत ढेकूरोड मित्रपरिवार ग्रुपतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी परिवारातर्फे शाल बुके पेढे देऊन आनंद व्यक्त केला. त्यात विजयसिंग पवार, कमलाकर सोनवणे, दिलीप पाटील, आधार पाटील, सुभाष सोनवणे, बी एम पाटील, सुधाकर धोबी, संजय पवार, गिरीश पाटील, संजय पाटील, कैलास सनेर, निलेश पाटील, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.