
अमळनेर:- तालुक्यातील मंगरूळ येथे सोमवारी रात्री चोरांनी एकच गल्लीत घरफोडी करत पाऊण लाखाचा ऐवज लंपास केला आहे.
तालुक्यातील मंगरूळ येथे दि. १८ जुलै रोजी चोरट्यांनी गावातील चार ते पाच घरांमधील मोबाईल, रोख रक्कम व सोने चोरून नेले आहे. त्यात १३ ग्रॅम सोने, तीन अँड्रॉइड मोबाईल तसेच रोख बत्तीस हजार रूपये असे सुमारे पाऊण लाखांचा ऐवज लंपास झाला आहे. यात विशेष म्हणजे ही चोरी एकाच गल्ली मध्ये झाली आहे. फिर्यादी सुनील पवार यांनी चार्जिंगला लावलेला अँड्रॉइड मोबाईल तसेच इतर दोन लोकांच्या घरातून अँड्रॉइड मोबाईल चोरून नेले आहेत. तर त्याच गल्लीतील चिंधाबाई पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून पेटीत असलेले सोने व रोख रक्कम चोरून नेली आहे. असे एकूण पाऊण लाखांचा ऐवज लंपास झाला असून या या बाबत अमळनेर पोलिसात भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे हे करीत आहेत.




