श्याम पाटील यांची उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड…
अमळनेर:- दि. ३१ जुलै रोजी संभाजी ब्रिगेड राज्य कार्यकारणीची बैठक शिवाजी नगर , पुणे येथे पार पडली. या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
अमळनेर येथील नगरसेवक व संभाजी ब्रिगेडचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्याम जयवंतराव पाटील यांची उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच तुषार भगवान सावंत यांची संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्हाध्यक्ष पदी व संदीप पितांबर पाटील यांची जळगाव शहर महानगरध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या वेळी कार्याध्यक्ष सुधीर भोसले, कोषाध्यक्ष अमोल काटे, महासचिव सुभाष बोरकर, उपाध्यक्ष छगन शेरे व सोमेश्वर आहेर, सचिव आत्माराम शिंदे, संघटक प्रदीप कणसे, पुणे जिल्हाध्यक्ष अजयसिंह खास, पुणे महानगरध्यक्ष हर्षवर्धन मगदूम हे उपस्थित होते. या वेळी मनोगत व्यक्त करतांना जास्तीत जास्त मराठा – बहुजन समाजाच्या तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळून देश – विदेशात जाऊन आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करावी असे आव्हान करत येणाऱ्या काळात “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा” या संकल्पेच्या माध्यमातून २० लाख तरुणांना विदेशात स्थैर्य मिळवून देण्याचा माणस प्रदेशध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांनी बोलून दाखवला. श्याम पाटील यांच्या या नियुक्तीबद्दल तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.